Share This Post

Featured News / Featured Slider / ज्ञान वाणी

अर्जुन, राजा जनक आणि जम्बूस्वामींप्रमाणे जिज्ञासा पाहिजे -प.पू.रमणीकमुनीजी म.सा.

अर्जुन, राजा जनक आणि जम्बूस्वामींप्रमाणे जिज्ञासा पाहिजे -प.पू.रमणीकमुनीजी म.सा.

जालना: प्रभू भगवान महावीरांच्या अंतर जगतामध्ये फुलांचा सुंगध आणि फळाचा रस आपल्याला चाखायला मिळतो. त्यांचे गुणवर्णन किती म्हणून करावे तेवढे ते थोडेच आहेत. म्हणूनच म्हटले आहे की, अर्जुन, राजा जनक आणि जम्बूस्वामींप्रमाणे जिज्ञासा पाहिजे, तुमची, आमची जिज्ञासा कशी आहे? याचा कधी तरी विचार केला का, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.

ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.

पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, अर्जुनाने गिता सांगितली अन् राजा जनक आणि जम्बू स्वामींनी आपल्याला सांगितले आहे. जेव्हा शिष्यत्व जेंव्हा बरसते तेव्हा मात्र हा घडा आपल्या गिळकृत केला पाहिजे, त्याचे रसपानही आपण चाखायला पाहिजे. कारण जेव्हा प्रभू भगवान महावीरांच्या नजरेतून आपण पाहल तेव्ंहा मात्र कोण कोणाचा शिष्य आहे, हेच लक्षात येत नाही.

गुरु कोण आणि शिष्य कोण? अशी जिज्ञासा होती जम्बू स्वामींची आणि सुधर्मा स्वामींची! तशी जिज्ञासा आपली तर नाही ना! मग आपल्याला कसे ओळखू येणार गुरु कोण आणि शिष्य कोण? प्रभू महावीराचं तन- मन हे भरलेलं होत. म्हणून त्यांना गुरु कोण आणि शिष्य कोण यातला फरक लक्षात येत नव्हता, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share This Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

Skip to toolbar