जालना : जीनवाणी अजूनही फायदा नाही तर ती आपल्या जीभेवर असायला हवी. आपला जन्म कुठे झाला, हे लक्षात घ्या. ज्यांचा जन्म या भूमीत आणि या अंगणात झाला ते भाग्यवान असले तरीही त्यांच्या जीभेवर जीनवाणी नसेल तर ते काय कामाचे, असे वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना सांगितले.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित श्रृत आराधनेच्या अध्यायातील प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, जीनवाणी आणि आगम फार काही वेगळे नाहीत. आपला जन्म कुठे झाला? तर या अंगाणात झाला. परंतू त्यासाठी नुसते एवढेच पुरेसे नाही तर जीनवाणी जोपर्यंत आपल्या जीभेवर येत नाही तो पर्यंत काहीही खरे नाही. आपण जैन कुळात जन्मलो परंतू जीनवाणी नसेल तर? त्यासाठीच जीनवाणी आवश्यक आहे.
जीनवाणी ही प्रत्येकाच्या तोंडात असायलाच हवी. ंंही जीनवाणी साधी सुधी नाही. त्यामुळे अनेक प्रकारचे संकटं, कष्ट दूर होतात, असेही ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात राम नाम के हिरे मोती, हे सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.