Share This Post

Featured News / Featured Slider / ज्ञान वाणी

…हे बंधन कोणामुळे आहे, याचा विचार करा-प.पू.रमणीकमुनीजी म.सा.

…हे बंधन कोणामुळे आहे, याचा विचार करा-प.पू.रमणीकमुनीजी म.सा.

जालना : आसक्ती, बंधन, आणि बेडीया हे कुणी घातलं तर पापने! तुमच्या गळ्यातील हार, कानातील आणि नाकातील कुणामुळं मिळालं! आसक्ती, दिवाना पण, जीस बंधन मिलते वो तो मोहनीया करम है। परंतू आपल्या हे लक्षातच येत नाही, त्याला कोण काय करणार! असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.

ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.

पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, आज- काल पुरुषही कानात घालू लागले आहेत. आणि हातातले ! कधी- कधी तर आमच्यासाठी खतरा बनून येतो. तरीही आम्ही घालायचे काही सोडत नाहीत. ये जो दिवाना पण है ।

पागल पण है… छोड दो इसे और आसक्तीमुक्त जीवन जगा, असेसांगून ते म्हणाले की, ही आसक्ती आपल्याला कुठचीही ठेवत नाही. तरीही तिलाच आवळून बसाययचे का? आसक्ती सोडा! पापमुक्त जीवन जगा, म्हणजे काय तर पुण्यच करत बसायचे का?

असे नाही. परंतू मला काय सांगायचे, म्हणायचे ते तुम्ही लक्षात घ्या. या गुरुंच्या अंगणात आपण बसलो आहोत, याची थोडी तरी शरम बाळगा, असेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share This Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

Skip to toolbar