जालना : साधना कशासाठी केली जाते तर ती स्वत:च्या भल्यासाठी ना!! पण इथे तर साधना केली परंतू तीही दुसर्यांसाठी! दुसर्यांसाठी कशी करता साधना परंतू ती काहींना करता येते, असे वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना सांगितले.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित श्रृत आराधनेच्या दहाव्या अध्यायातील प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. पुढे बोलतांना म्हणाले की, लेकीन भाव क्यो नही आता । जब मौत आयेगी तब कोई नही आयेगा छोडनेंको। हाथी अगर किचड में गया तो वो अच्छी जगह पर आ जायेगा। लेकीन आपकी साधना उसे लेकरही आयेगी। पर क्या वो साधना उसी के लिए है। नही ना! फीर वो कैसा आयेगा। जब हमारे रोम- रोम तरंगीत होते है तो इन्हि पलो में आनंद आता ये। ये तरंग जितनी गहराईसे उठायीगी तो आनंद आना ही आना है। कल हम दो भाई की कथा का रस ग्रहन करेंगें।
कभी कभी प्रश्न और होते है, उसका जबाब कही ओर होते है, असेही ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.