श्रीरामपूर दि. 20 (वार्ताहर) : मनाचा निश्चय ठाम असेल व मन खंबीर असेल तर मोहाच्या बंधनातुन सुटका होते. धर्म आराधनेसाठी मन नेहमी जागरुक ठेवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रज्ञाज्योती प. पू. विश्वदर्शनाजी म.सा. यांनी जैन स्थानकमध्ये चातुर्मासार्थ सुरु असलेल्या प्रवचनातुन केले.
आपण नेहमी लोक काय म्हणतीय याचाच विचार करतो, त्यापेक्षा प्रभु काय म्हणेल याचा विचार केला पाहिजे, श्रीरामपूरात लहान मुलांनी तपसाधनेत मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. लाहन मुलांकडुन मोठ्यांनी शिकले पाहिजे, प्रभु कृपा होण्यासाठी सद्बुध्दीचा स्वामी होण्याची आवश्यकता आहे.
धर्म आराधनेच्या शुभकार्याला विलंब करु नये, डॉक्टर आरोग्याचे निदान करतात, विवाहामुळे दोन परिवारांचे कल्याण होते, पण दिक्षा घेतल्यास जीवनाचे कल्याण होते, शरीराला जितक्या जास्त वेदना द्याल तितके कर्मापासुन निर्णय मिळवाल. प्रभु भावनाचा आशिर्वाद मिळाला की कोणतेच टेन्शन उरत नाही. जे काय प्रेमाने होते ते रागावुन होत नाही. आत्म्याचा स्वामी होण्याचा प्रयत्न करावा असे पू. विश्वदर्शनाजी म.सा. यांनी प्रवचनातुन स्पष्ट केले.
विद्याभिलाषी पू. तिलकदर्शनाजी प्रवचनातुन म्हणाल्या की, तपस्यामुळे प्रभुची कृपा हमखास होते, यावर विश्वास ठेवावा, आज कल सर्व गोष्टी इन्स्टंट मिळाव्यात असे काही ना वाटते पण कोणतीही गोष्ट परिश्रमाशिवाय मिळत नाही. चातुर्मासातील धर्म आराधना जीवनाला सुख व आनंद देणारी संधी आहे. ही संधी सोडु नये असे आवाहन केले.