जालना : आत्मा हाच परमात्मा आहे, पण हे लक्षात कोण घेतो. त्यासाठी संकल्प करावा, परंतू आम्हाला तर संसाराशिवाय काहीही लागत नाही, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, आपण डॉक्टर, इंजिनिअर, वकील काहीही बनू शकतो. परमात्मा तर आम्ही केवळ तसे बनू पाहतो, परंतू त्यासाठी त्याग करण्याची आमची इच्छा आहे का, असे सांगून ते म्हणाले की, एक गाव होते आणि त्या गावात दोन मिठाचे पुतळे होते. त्यांनी विचार केला की, आपल्याला ह्या समुद्र हा मोजयाचा आहे, त्यासाठी आपल्याला त्यात डुबकी लावावी लागेल. असा त्यांनी विचार केला आणि ते गेले डुबकी घेण्यासाठी! त्या दोघांनीही डगरीवर जाण्याऐवजी लांबूनच पळाले, तेव्ह्यात गावकरी जमलेले होते, ते त्यांना पाहून ओरडू लागले परंतू ते काही थांबले नाहीत, अखेर त्यांनी डुबकी ही घेतली. परंतू गावकरी इकडे चर्चा करु लागले, केव्हा ते येतात म्हणून!
सकाळची संध्याकाळ झाली परंतू ते काही आले नाहीत, तेव्हढ्यात एक जण आला आणि म्हणाला, ते काही आता येणार नाहीत.ते समुद्रात मिसळे आहेत. समुद्रात! असं मिसळणं आम्हाला कधी जमणार आहे का? असे सांगून त्यांनी यावेळी सात मुलांची कहाणीही सांगितली. तत्पूर्वी म्हणजे सुरुवातीलाच त्यांनी लॉटरीची गोष्ट सांगितली आणि आपल्या प्रवचनाला पूर्णविराम दिला.
याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.