Share This Post

Featured News / Featured Slider / ज्ञान वाणी

पुण्यवाणी मुळंच आपल्याला ही जीनवाणी मिळाली-प.पु.रमणीकमुनीजी म. सा.

पुण्यवाणी मुळंच आपल्याला ही जीनवाणी मिळाली-प.पु.रमणीकमुनीजी म. सा.

जालना : चांगले आणि उत्तम शिष्य आज कुठे मिळतात. हे सांगायचे धारिष्ट यामुळे करतो की, पुण्यवाणी मुळचं आपल्याला ही जीनवाणी मिळाली आहे. फ्रीमध्ये आमच्या शिवाय कोण मिळतं,असे वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना सांगितले.

ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित श्रृत आराधनेच्या अध्यायातील प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, आज काल कुठे चांगले आणि गुणवान शिष्य मिळतात! पण आम्ही भाग्यशाली आहोत की, आम्हाला चांगले आणि गुणवान गुरु मिळाले आहेत, तसेच शिष्य देखील मिळाले आहेत. जे आमच्या डोळ्यांच्या इशार्‍यावर चालतात. आज खरे तर गुणवान आणि चांगले शिष्य कुठे मिळतात! ज्याप्रमाणे आपले मुलं- मुलीप्रमाणेच आमचे शिष्य आहेत.

गुरु म्हणजेच जे मोठे आहेत, तेही आपले गुरुचं आहेत. त्यामूळंचं प्रत्येकानेच नियम पाळले पाहिजेत. जो आपल्याला आई-वडीलांना मानतो, तो आपल्या खानदानालाही माणू लागतो. गौतम स्वामी! इंद्रभूती या नावानं कुणी ओळखू नाही तर ना ओळखू पण त्यांना गौतम स्वामी या नावाने प्रत्येक जण ओळखत आहे. खरे तर त्यांचे गौत्र गौतम आहे, परंतू! दगडावर कितीही पाणी टाकले तरी, असेही ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात राम नाम के हिरे मोती, हे सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share This Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

Skip to toolbar