जालना : दु:ख मनुष्याला सुखा समाधानाने जगू देत नाही आणि दोषमनुष्याला धर्मापासून वेगळे करतो, म्हणूनच दोष आणि दु:ख ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. पुढे बोलतांना म्हणाले की, मनुष्याकडे कितीही सर्व सुख सुविधा असल्या तरी त्याला दु:ख हे जगू देत नाही आणि दोष मनुष्याला सुधूरु देत नाही. हे काही दोषाचे पातक नाही तर मोहनिया कर्माचे आहे. म्हणून अगोदर मनुष्याने आपल्याकडे असलेले मोहनिया कर्म घालवण्यासाठी प्रयत्न करावेत, त्याशिवाय आपल्यातील मोहनिया कर्म संपणार नाही, असे सांगून ते म्हणाले की, साधना सुध्दा दोन प्रकारची असू शकते. एका साधेत परमात्मा भगवयंत, जे की, आपल्याला धर्माशी जोडण्यास मदत करतात. एक साधना आपण दु:ख दूर करण्यासाठी देखील करतो. मग या साधनेत काय अर्थ आहे? जी साधना आपल्याला धर्मापासून दूर लोटते, अहंकार जागृत करते, ती साधना कसे काय महत्वाची असू शकेल, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. तत्पूर्वी त्यांनी दोन मित्रांची गोष्टही सांगितली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.