Share This Post

Featured News / Featured Slider / ज्ञान वाणी

उसाचा रस हा सर्वश्रेष्ठ आहे! -प.पू.रमणीकमुनीजी म.सा.

उसाचा रस हा सर्वश्रेष्ठ आहे! -प.पू.रमणीकमुनीजी म.सा.

जालना : मोसंबीचा असू द्या नाही तर अन्य कोणताही पण भगवान प्रभू मानतात की, उसाचा रस हा सर्व श्रेष्ठ आहे, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.

ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात म्हणजेच 47 व्या महावीर की अंतयात्रेवर श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.

श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. पुढे बोलतांना म्हणाले की, मोसंबीचा असू द्या नाही तर अन्य कोणताही पण भगवान प्रभू मानतात की, उसाचा रस हा सर्व श्रेष्ठ आहे, हे कुणी सांगितले आहे तर सुधर्मा स्वामींनी! कुणाला सांगितले आहे तर आपल्याला सांगितले आहे. का सांगितले? त्याचे कारणही तसेच आहे. चोहोबाजूंनी गर्मी आणि मध्यत्तंरात ते होते. सार्‍या बनारसमध्ये त्यांचीच चर्चा होती. ही गोष्ट तेथील राजाच्या कानावर पडली. प्रधान म्हणाला की, महाराज आपल्याला जायला पाहिजे. हीच गोष्ट राजालाही पटली आणि तोही त्यांचा सन्मान करण्यासाठी रवाना झाला. म्हणून भगवान प्रभूंचा हा रस आहे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share This Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

Skip to toolbar