Share This Post

Featured News / Featured Slider / ज्ञान वाणी

आम्ही उपकार का विसरत चाललो आहोत-प.पू.रमणीकमुनीजी म.सा

आम्ही उपकार का विसरत चाललो आहोत-प.पू.रमणीकमुनीजी म.सा

जालना : यहॉ हमे आत्मा जिन्होंने जोडा है। उनको ही हम भूल जा रहे। हमे इससे क्या मिलता, आम्ही प्रभूंचा उपकार कधीही विसरु नये, त्यांनी आपल्यावर कोणता उपकार केला नाही, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.

ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात म्हणजेच 62 दिवस पुच्छीसुमन तप महोत्सवात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.

श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. पुढे बोलतांना म्हणाले की, प्रभू महावीरांमुळेच आम्हाला ही जीनवाणी आम्हाला मिळाली आहे. आम्ही पाहिले की, आमच्यावर प्रभूंचे अनंत उपकार आहेत. आज जे काही आपण आहोत, केवळ आणि केवळ त्यांच्यामुळेच आहोत. रसो का राजा है वो। वो भी गन्ने का रस । असा तसा रस नाही. पद्मवती आणि धणेंद्रजींची कहाणी त्यांनी सांगितली. यावेळी उपस्थितांच्या अंगावर शहारे उमटले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share This Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

Skip to toolbar