जालना : हा मनुष्य जन्मला आला तो उगीच मिळाला नाही, तो मिळवण्यासाठी न जाणो किती- किती पुण्याच्या राशी खर्च कराव्या लागली असतील, म्हणूनच तर आम्हाला हा जन्म प्राप्त झाला आहे. परंतू त्या लायक आपण आहोत? हा खरा प्रश्न आहे, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात म्हणजेच 62 दिवस पुच्छीसुमन तप महोत्सवात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. पुढे बोलतांना म्हणाले की, सागर बहोत गंभीर है। लेकीन क्यो, क्यो की, वो गहरा होता है । ज्यो गहरा नही वो गंभीर कैसा? समुद्र के वजह से नदीयाँ है। बलकी नदीयाँ केवल एक दिखावा है। भगवान के भक्त है या भक्त है करके भगवान है। महावीर समझने के लिए महावीरच बनना पडेगा । हम उनके सामने कुछ भी नही। भगवरन के सामने हम क्या मांगते है। हिंम्मत है तो किंमत ंहै। शक्ती मांगी तो कठीणाई मिलती है, क्यो कठीणाई? परत्मा से मांगो गे तो वो जरुर देगा । असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.