जालना : काय योग्य, काय अयोग्य हे कळायला हवे. एखाद्याला पोहता चांगले येते. मात्र बुडणेच चांगले वाटत असेल तर… आज सहाव्या अध्यायावर त्यांनी विवेचन केले. ते म्हणाले की, काही मर्यादा पाळा आणि ही मलिनता दूर करा, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, मला सुधारवे असे वाटत असेल तर जीणवाणी आत्मसात केल्याशिवाय गंत्यंतर नाही. ऑपरेशन एक घंट्याचं, लागले आठ ते दहा घंटे! हिशोब तर आपण ठेवतांच ना! आपण ऐकायला आलात, हे खरे असले तरी भगवान महावीराचं जीवन जगा, आपण सगळे जण महावीरांची संतान आहोत. तोच आमचा बाप आहे! यात कसलीही शंका नाही.
आमच्याकडे दोनच डोळे असले तरी त्यांच्याकडे अनेक डोळे आहेत. अंध:काराला प्रकाशाकडे नेण्याचे काम करा, असेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.