जालना : ैआज जरी प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असला तरी त्यालाही दुसर्यांच्या काड्या केल्याशिवाय त्याला करमत नाही. मात्र सत्याला ठोकर मारणारा एक दिवस नक्कीच पश्चाताप करतो, असे वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना सांगितले.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित श्रृत आराधनेच्या अध्यायातील प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. पुढे बोलतांना म्हणाले की, राग आणि व्देष जेव्हा कमी होईल, तेव्हा तर आम्ही त्याच्याशी जोडल्या जाऊ! परंतू राग आणि व्देषाला तर आम्ही करु पाहत नाहीत. म्हणून आपणही प्रभूंशी जोड्ल्या जाऊ शकत नाही. म्हणून प्रत्येकाने सत्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे, परंतू आम्ही तो करु शकत नाही. सत्यला कधीही ठोकरु नका. जो सत्याला ठोकर मारतो, तो कधी ना कधी तरी पश्चाताप आल्याशिवाय राहत नाही.
सत्य कधीही बलवान असते. परंतू असत्य कधीही बलवान असू शकत नाही. म्हणून सत्याची कास कधीही सोडली नाही, असेही ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.