जालना : या व्यर्थ गोष्टी नाहीत. हा आगमचा रस आम्हाला गृहण करण्याची संधी मिळाली आहे, त्याचे सोने करण्याची हीच वेळ आहेे, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित श्रृत आराधना या विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. पुढे बोलतांना म्हणाले की, हा रस गृहन करण्याची संधी मिळाली त्याचे सोने केल्याशिवाय कुणीही राहू नये. ये आंगण में जब बाबा आये थे । तब वो बिमार थे, रुग्ण थे। पर उन्होने आगम रस गृहण करना नही छोडा। जब वो नही छोड रहे तो अपुने क्या मानकर छोडना। आज आठव्या दिवसापर्यंत आलो आहोत. जब हम चोर नही है। पर चोर कुछ लेकरही जाते है। बाबा तुम्हारे पास तो कुछ नही मिला। लेकीन तुम्ंहारे अंदर जो है वो तो दे दो। न जाने हम भी कब ऐसे चोर बनेगें। परमात्मा के चरणो को हम नमन करते है। लोग शिवलिंगपर दुध भी पाणी मिलाकर डालते है। क्या ये बराबर हे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.