जालना : प्रभू महावीरांनी जे- जे सांगितले त्याचे अनुकरण आम्ही करतो का? त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. त्यांच्या सुंगधाचं रसपान करण्याची हीच वेळ आहे. सवाल आणि उत्तरही महावीरचं आहे. म्हणूनच म्हटले आहे की, प्रभू महावीरांना विसरल्यानंच आमच्या समस्या वाढू लागल्या. आपल्या समस्या का वाढू लागल्या याचा विचार करण्याची हीच वेळ आहे, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, प्रभू महावीरांनी जे काही सांगून ठेवले आहे, ते काही उगीच सांगितले नाही. तीर्थंकरांचा परिचय एकीकडे प्रभू महावीरांंचा एकीकडे आहे.
प्रभू महावीरांच्या जीवनात झोकून पाहिले तर आपल्याला तेथे सर्व काही मिळेल. जितका वेळ आपण त्यांची तितका वेळ आपण त्यात रममान होऊन जाऊत. पण आम्ही केवळ त्यांच्याच नावाचा जयकार करत आहोत. प्रभू महावीरांना विसरु नका. तर त्यांना जवळ करा. आज आपल्यात ज्या काही समस्या निर्माण झाल्यात. आपल्यात धैर्य हवे, साहस हवे. तरच आपण त्यांच्या प्रति आस्था बाळगू अन्यथा नाही, असेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.