Share This Post

Featured News / Featured Slider / ज्ञान वाणी

पंतप्रधान आणि राष्ट्रपतीही प्रभू आहेत-प.पू.रमणीकमुनीजी म.सा.

पंतप्रधान आणि राष्ट्रपतीही प्रभू आहेत-प.पू.रमणीकमुनीजी म.सा.

जालना : तपोधाममध्ये कालपासून श्रृतआराधना सुरु झाली. पदांचे काय घेऊन बसलात. पंतप्रधान आणि राष्ट्रपतीही माझे प्रभू आहेत, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.

ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.

श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. पुढे बोलतांना म्हणाले की, पद काय आज आहे आणि उद्या नाही. परंतू प्रभू महावीर तर अंनंत काळापर्यंत आहे. श्रृत देव कशाला म्हणतात, तेच आमच्यासाठी सर्वस्व आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती तर आज आहेत आणि उद्या नसतील परंतू प्रभू महावीर तर हमेशा आमच्याबरोबर राहणार आहेत. ते कधी? प्रभू महावीर येणार म्हटल्यावर ती खुशी आपल्या चेहर्‍यावर झळकली पाहिजे. तो आनंद आपल्या चेहर्‍यांवर दिसला पाहिजे. कुणी आपल्याकडे येणार म्हटल्यावर आपल्या चेहर्‍यांवर कशी खुशी- आनंद दिसतो. तसाच तो आताही दिसला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share This Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

Skip to toolbar