जालना : आपण जर मनातून सामाईक करत असाल तरच आपल्या त्याचे फळ मिळेल, अन्यथा नाही. हे साधे- सरळ गणित आहे. त्यासाठी सामाईक करतांना मन आपलं विचलीत झालं नाही पाहिजे, त्यातच आपले हित आहे, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, आपण जर मनातून सामाईक करत असाल तरच आपल्या त्याचे फळ मिळेल, अन्यथा नाही. सामाईकमध्ये ढोंग नको. हे साधे- सरळ गणित आहे. त्यासाठी सामाईक करतांना मन आपलं विचलीत झालं नाही पाहिजे, त्यातच आपले हित आहे, धर्म हा आपला वैरी नाही. धर्मात सर्व काही आहे. म्हणूनच धर्माला कधीही विसरुन जाऊ नये. किंवा तसा प्रयत्न देखील करु नये. कारण तसं केल्याने पाप लागल्याशिवाय राहणार नाही.
पाप लागणंही चांगलं नाही. हे सर्व मिथ्यार्थ कर्म असून त्याने कसे भले होणार! कर्म करायचे तर चांगलेच केले पाहिजेत. चांगले कर्म हे आपल्याला नरक गतीला नेत नाही तर ते स्वर्गातच पोहचणार आहे. म्हणून मनुष्याने नेहमीच चांगले कर्म केले पाहिजेत, असेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.