Share This Post

Featured News / Featured Slider / ज्ञान वाणी

जितकी भुक तितकेच खा-प.पू.रमणीकमुनीजी म.सा.

जितकी भुक तितकेच खा-प.पू.रमणीकमुनीजी म.सा.

जालना : जितकी भुक आहे तितकेच खाल्ले तरच ते पंचन होते, अन्यथा नाही. म्हणूनच भगवंतांनी सांगून ठेवले आहे की, आपल्याला जितकी भुक असेल तेवढेच गृहन केले तरच ते आपल्याला पचन होते, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.

ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.

पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, काही जण तर खाते- खातेही जाते है । धर्म करतांनाही ते दु:खी राहतात. धर्म करतांना तरी मनुष्याने आनंदी राहिले पाहिजे. मात्र दु:खी व्यक्ती धर्म करत असेल तर तो तर धर्म करत नाही. उलट तो दुसर्‍यांनाही दु:खी करतो. क्यो की, धर्म ही आनंद है। और ये आनंद कुणीही हिस्कावू शकत नाही. महावीर के जीवन मे आपको एक जिज हमेशा रहथी ंहै की, ओ हमेशा आनंदी रहथेथे। क्योकी ओ आनंद का भंडार है । इसिलिए आपुन भी हमेशा आनंदी राहायला हवी. आनंदी जिवन जगल्याने काहीच वाईट होत नाही. मात्र जास्त खाल्ल्याने निश्चितच आपले वाईट होईल. कारण ते शरीराने पेलले पाहिजे, त्याला ते सहन झाले पाहिजे. ्रआपण सामायिक करतांनाही भरपेट जेऊन आला असाल तर…. काय होते हे आपल्याला माहित आहे. म्हणूनच जितकी गरज आहे, तेवढेच खाल्ले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share This Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

Skip to toolbar