Sagevaani.com /जालना: साध्वी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. यांचा 51 वा दिक्षा दिवस आज श्री. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी देशभरातून भक्तगण उपस्थित होते.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात साध्वी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. यांंचा दिक्षा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी शुभेच्छापर साध्वी गुरुछायाजी म. सा. यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून साध्वी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. यांच्या सानिध्यातील आपल्या दिवस कसे जात आहेत, हे सांगितले.
त्यानंतर साध्वी प. पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या नावातील तीन एस बद्दलची माहिती विषद करुन सांगितली. त्यानंतर राज्यातून तसेच परराज्यातून आलेल्या भक्तांनी आपल्या भावना त्यांच्याप्रती व्यक्त केल्या. यावेळी साध्वी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. यांनीही उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती. शेवटी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन करुन सर्वांचे आभार मानले.