प्रवचन – 13.07.2025 – प पू श्री मुकेश मुनीजी म सा – (बिबवेवाडी जैन स्थानक) आज प्रत्येक माणसाला जीवनात सुख आणि शांती हवी आहे. मात्र दुर्दैव असे की, आजचा माणूस हे सुख भौतिक वस्तूंमध्ये शोधत आहे – कोणी गाडीत, कोणी मोबाईलमध्ये, तर कोणी प्रवासात. पण खरं सुख कुठे आहे? खरं सुख आहे – परमात्म्याच्या भक्तीत. परमात्म्याची भक्ती ही अशी अमूल्य गोष्ट आहे की जी माणसाला अंतःकरणातून शांतता देते. पण आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या धावपळीच्या वेळापत्रकात, आपण ह्या भक्तीसाठी वेळच काढत नाही. जर खरोखर सुख हवं असेल, तर जीवनात सतत परमात्मस्मरण, जप, तप, साधना आणि आत्मअनुशासन आवश्यक आहे. आगम वाचन आणि त्याचे आचरण हेच आपल्या कर्मक्षालनाचे माध्यम आहे. आगम म्हणजे केवळ ग्रंथ नव्हे, तर जीवनशैलीचे मार्गदर्शन. जीवनातील दु:खापासून मुक्त होण्यासाठी आपल्याला धर्मरूपी गंगेत स्नान करावेच लागेल. जसे शरीराची स्वच्छता स्...