Share This Post

Featured News / Featured Slider / ज्ञान वाणी

सहनशिलतेमुळे क्रोधावर मात करता येईल : विश्‍वदर्शनाजी

सहनशिलतेमुळे क्रोधावर मात करता येईल : विश्‍वदर्शनाजी

श्रीरामपूर दि.11 (वार्ताहर) : क्षुल्लक कारनावरुन क्रोधाच्या आहरी जाऊ नका, हा जिवनाचा वाटोळे करतो, सहनशिलता हा गुण अंगी बाळगला तर क्रोधावर मात करता येईल, जीवन सुखी व आनंदी होईल असे प्रतिपादन पू. श्री. विश्‍वदर्शनाजी म.सा. यांनी केले.

कोणी काही वाईट किंवा अपशब्द बोलले तर आपला रागाचा पारा चढतो, आपण त्याला प्रत्युत्तर देतो, त्यातुनच आगीचा भडका उडतो हा भडका उडु नये म्हणुन सहनशिलता अंगी असली पाहिजे असे स्पष्ट करुन त्या म्हणाल्या की आपण पेट्रोल नव्हे तर पाणी बनावे, पेट्रोलने आग भडकते, पाण्याने विझते, ग्रीन लाईट लावला तर क्रोध शांत होतो, अनेक वेळा आपल्या कामात अडथळा येतात, अशा वेळी राग येतो पण अशावेळी रागावर नियंत्रण ठेवता आले पाहिजे, लहान – लहान गोष्टीत रागवणे चुकीचे आहे, मौन गिळुन गप्प बसण्यात पुरुषार्थ असतो.

आदर्श घरात मुलांना आईकडुन वात्सल, पित्याकडुन छाया आणि बहिन भावांची एकमेकाला साथ मिळते, ज्या घरात वडील असतात त्या घराकडे कुणीही वाईट नजरेने पाहु शकत नाही, भगवान श्रीकृष्णला वडील वासुदेवांनी वाचविले, आई इतकेच ममत्व वडिलांनाद्यावे लागते, प्रेम, सहनशिलता, निष्टा या भावनावर घर सुरक्षित राहते.
ज्या घरच्या भिंती मर्यादा आहेत त्या घराची सुरक्षितता मजबुत असते, कोणीही त्या घराला तोडु शकत नाही, ज्या घराला छत नाही त्या घरातील माणसे उडघी पडतात, म्हणुन सहनशिलतेचे छत असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Share This Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

Skip to toolbar