Share This Post

Featured News / Featured Slider / ज्ञान वाणी

महिलांनी संस्कृती जपली तर भावी पिढीवर साचांगले संस्कार होतील. – पू .श्री .विश्वदर्शनाजी म .सा

महिलांनी संस्कृती जपली तर भावी पिढीवर साचांगले संस्कार होतील. – पू .श्री .विश्वदर्शनाजी म .सा

श्रीरामपूर दि. २२ : महिलांना स्वातंत्र्य असले तरी त्याचा गैरवापर करू नये. भारतीय संस्कृती जगात अग्रभागी आहे.आपली वेशभूषा,वाणी,व्यवहार,हा संस्कृतीला धरूनच असला पाहिजे. भारतीय महिलांनी संस्कृती जपली तर भावी पिढीवर चांगले संस्कार होतील असा उपदेश जैन स्थानकमध्ये चातुर्मास निमित्त सुरु असलेल्या प्रवचनातून प्रज्ञाज्योती प्रखर व्याख्यात्या पु.श्री .विश्वदर्शनाजी म.सा यांनी दिला.

महिला या शब्दाचे महत्व विषद करताना त्या म्हणाल्या कि,पूर्वी घागरा ओढणी ,घुंगट असा स्त्री चा पेहेराव होता काळा नुरुप तो बदलला आहे. आता साडी हा पेहेराव बनला आहे. पदर अंग झाकण्यासाठी असतो हे आजच्या महिला विसरत आहेत. हि चांगली बाब नाही. भारताच्या माजी राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील व स्व. सुषमा स्वराज यांनी भारतात तसेच विदेशात असतानाही भारतीय संस्कृती जपली महिलांपुढे आदर्श ठेवला देशाची शान वाढवली त्यांचा आदर्श महिलांनी घ्यावा.
मालाची दुकानात खरेदी करण्यापूर्वी आपण परीक्षा घेतो त्याची गुणवत्ता ,वजन,आकार आदी तपासतो माणसाची परीक्षा त्याच्या वाणी,व्यवहार आणि वर्तनावर होते. वधू वर पसंतीच्या वेळी धर्माबद्दल फक्त मुलींनाच विचारले जाते हा प्रश्न आहे मुलांना सुद्धा धर्माबद्दल,ज्ञानाबद्दल विचारलेच पाहिजे.तरच मुले व मुलीं मध्ये समानता राहिल जीला कोणी शत्रू नाहीत ती म्हणजे नारी होय. महिला माहेर व सासर या दोन्ही परिवारांना प्रेमाच्या धाग्यांनी बांधून ठेवते.
लाज शरम हे भूषण महिलांचे आहे.पूर्वीच्या जमान्यात लग्नापूर्वी मुलींची कसून परीक्षा व्हायची आज मुली स्वतः त्या मुलाची परीक्षा घेतात. शिक्षणाने सर्व बदलले आहे. असे असले तरी महिलांनी पती,सासू,सासरे व वडीलधाऱ्यांच्या आदर करावा धर्माचरण करणाऱ्यांची संख्या वाढवावी असे पु.श्री.विश्वदर्शनाजी यांनी सांगितले.
पु.श्री तिलकदर्शनाजी म .सा प्रवचनातून म्हणाल्या कि, एक तास प्रवचन श्रवणाने पापापासून निवृत्ती मिळते. मन शांत राहते.कोणाची निंदा,चुगली केल्यास पापाचे प्रायश्चित्त होते. क्रोध,मोह,माया व लोभापासून दूर रहा.प्रत्येकाने परमेश्वर ,भगवंताचे चिंतन , मनन करून दिवसभरात केलेल्या पापकृत्याची आलोचना करून क्षमा मागावी व माझ्याकडून असे पुन्हा कधीही घडणार नाही असा आशीर्वाद घ्यावा .

Share This Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

Skip to toolbar