श्रीरामपूर दि. 15 (रमेश कोठारी) वडिलधार्यांची छाया असणे हि भाग्याची बाब आहे. वडीलधारी माणसे ही दीपस्तंभासारखी आहेत.थोरांचे आशीर्वाद वाया जात नाही. वडीलधारी माणसे घरात असलीच पाहिजेत .म्हणूनच म्हणतात कि “बुजूर्गोकी छाया बडी चीज है” ! असे प्रतिपादन प्रखर व्याख्यात्या साध्वी पू .श्री. विश्वदर्शनाजी म .सा यांनी केले.
दादा गुरुदेव स्व. पू .श्री तिलोकऋषीजी यांचे पुण्यस्मृती दिनानिमित्त त्यांना वंदन करून त्यांनी सांगितले कि. इमारतीचा पाय बडी चीज है ! तिजोरीकी माया बंदी चीज है !तसेच बुजूर्गोकी छाया बंदी चीज है !प्रत्येकाने वडीलधाऱ्यांच्या आदर सन्मानाने मन ठेवा. त्यांना अपमानित करू नका. त्यांचे मार्गदर्शन घ्या .पूर्वीचे रीतिरिवाज ,चाली परंपरा बंद झाल्याने आज दुर्घटना वाढल्या आहेत . दादा गुरुदेव यांचे कार्याबद्दल सविस्तर माहिती प पू . विश्वदर्शनाजी म .सा यांनी प्रवचनातून दिली. त्यांच्या कुटुंबातील चौघांनी दीक्षा घेऊन संत व साध्वी झाल्याचे उदाहरण वेगळे म्हटले पाहिजे.
गुरुप्रती आदर असावा त्यांची प्रतिष्ठा टिकवावी महापुरुष होण्यासाठी अपार कष्ट सोसावे लागतात .हि दुनिया मतलबी ,स्वार्थी आहे. धर्मसंस्कार विसरू नका .पूर्व जन्मीचे पुण्य उपयोगी पडते. नऊचा पाढा ठेवा. हा पाढा संयम शिकवितो . संयमाने मनाचे संतुलन रहाते . प्रवचन कानात, प्राणात ऐकावे.दीक्षा घेतल्यानं संसारिक काळजी नसते ते प्रभूच्या चिंतनात मग्न असतात.
प.पु . तिलकदर्शनाजी म .सा यांनी चातुर्मासातील सम्यक दर्शनाबाबत मार्गदर्शन केले. चांगले विचार ऐकल्याने ,आचरण केल्याने निश्चित चांगले अनुभव येतात. जीवनवानी ऐकल्याने जीवनाला दिशा मिळते.