जालना : आसक्तीचं मनुष्यालाच कोणत्या थराला नेऊन ठेवील हे सांगता येत नाही. परंतू सोन्याने माणसाला बांधून ठेवले आहे. ज्यांच्या आहे, आणि ज्यांच्याकडे नाही, त्यांचाही झोप उडाली आहे.त्यालाच तर सोना म्हणतात. पाप- पुण्य हेच नाही तर काय, , असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, पाण्याचा स्वभाव हा खाली जाने तर अग्नीचा स्वभाव हा वर जाण्याचा आहे. परंतू भगवानने म्हटले आहे की, पाणी हे मनासारखे आहे. जसे मन तसे पाणी! स्वार्थी व्यक्तीची प्रसन्नता आणि निस्वार्थ व्यक्तीची प्रसन्नता यात जसा जमिन आसमानचा फरक आहे. तसाच तो पाणी आणि मनाचा आहे. अग्नीचा आहे! व्यक्तीच्या मनात नेहमीच निस्वार्थ भाव यायला पाहिजे. परंतू दुर्देवाने तो येत नाही.
याचे कारणच मिथ्यात्व आहे. ज्या ठिकाणी मिथ्यात्व आहे, तेथे चांगल्याचा विचार येणार कुठून? म्हणूनच सांगतो आहे की, नेहमीच खरे बोला, खरे वागा! पण आमचे ऐकतो कोण? जेथे मिथ्यात्व भाव हे उजेडात येतात. तेथून चांगली अपेक्षा कशी ठेणार, हा खरा प्रश्न आहे, असेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली.
त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.