Share This Post

Featured News / Featured Slider / ज्ञान वाणी

उत्तराध्ययन सुत्र समुद्रासारखं असलं तरीही-प. पू. हर्षप्रज्ञाजी म. सा.

उत्तराध्ययन सुत्र समुद्रासारखं असलं तरीही-प. पू. हर्षप्रज्ञाजी म. सा.

Sagevaani.com /जालना: श्रीमद् उत्तराध्ययन सुत्र हे समुद्रासारखं असलं तरीही प्रभूंनी आमच्यासाठी त्यात लहान- लहान सुत्राचा समावेश केला आहे. जो की आपल्यासाठी आहे. समुद्राचं पाणी आपण पूर्णपणे पीऊ शकत नाहीत, परंतू घड्यात असलेलं पाणी ग्लासाने थोडे- थोडे पीऊ शकतो, अगदीत्याच प्रमाणे उत्तराध्यन सुत्राचेही आहे, असा हितोपदेश साध्वी प. पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.

तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. पुढे बोलतांना साध्वी प. पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. म्हणाल्या की, ज्याप्रमाणे आपण समुद्र, तलाव आणि नदीचं पाणी एकसाथ पीऊ शकत नाही. परंतू तेच पाणी घड्यात भरल्यानंतर आपण त्यासोबतच एक तांब्या आणि एक ग्लास ठेवतो. ज्यामुळं आपल्याला थोडे- थोडे करुन ते पाणी गृहण करणे सोपे जाते.

अगदी याचप्रमाणे उत्तराध्यन सुत्राचंही आहे. उत्तराध्यन सुत्र समुद्राप्रमाणे मोठे असले तरी प्रभूंनी आमच्यासाठी त्याची सोय करुन ठेवली आहे. उत्तराध्यन सुत्रातील छोटे- छोटे सुत्र हे प्रभूंनी आपल्यासाठीच निर्माण केले आहेत. म्हणून हे सुत्र अंगीकारण्यास सोपे आणि ते प्रत्येकानेच आपल्या जीवनात उतरवले पाहिजेत, असे सांगून साध्वी प. पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. म्हणाल्या की, प्रभूंची ही वाणी प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे. त्यामुळेच आपला आत्माही परमात्मा बनू शकतो.

प्रभूंच्या बरोबरीने आपली आत्मा पोहचू शकते, असे सांगून त्या म्हणाल्या की, कालपर्यंत आपण सर्वांनीच एकवीस अध्यायांचा अर्थ समाजावून घेतला आहे. आता पुढील म्हणजे बावीसाव्या अध्यायाचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. तर या बावीसाच्या अध्यायात प्रभूंनी कोणाची स्तुती गायीली आहे. भगवान अरिष्टमुनी यांची! अरिष्टमुनी ज्यावेळी विवाह करणार होते. परंतू भोजनात दोष होता. ना वर्‍हाडीमंडळींमध्ये दोष होता. ना घरच्यामध्ये दोष होता. ना नवरसेव- नवरीमध्ये दोष होता, असे सांगून त्यांनी प्रभू महावीर आणि श्रीमद् उत्तराध्यन सुत्राबद्दल विविध उदाहरणाव्दारे त्यांनी पंचवीस अध्यायांची माहिती दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्‍याची मोठी उपस्थिती होती.

Share This Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

Skip to toolbar