जालना : अनुभव करायला या तर…. अनुभव कराल! येथे जे येतात ते अनुभव करायला तर येतात. आत्मसात करणे म्हणजे काय? आम्ही सुधर्मा स्वामीची अनुभूूती तर करु शकत नाहीत. अनुभूती प्राप्त केव्हा करणार, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, महात्म्यांची अनुभूती केव्हा होईल, तर जेव्हा ते रिकामे होईल, तेव्हा! सर्वदर्शी व्हायलाही आचारण सुध्दा तसे हवे. आपल्याला सामायिक मध्ये खुप काही गंदगी भरलेली आहे, म्हणून तर आपल्याला त्यात आनंद मिळत नाही. आपल्या आतमध्ये असलेली गंदगी तर करा, असे सांगून ते म्हणाले की, जो पर्यंत आम्ही ही गंदगी, ही घाण, हे चारित्र्य हनन जोपर्यंत जात नाही, तो पर्यंत आपण कितीही सामायिक केले तरी त्याचा काय उपयोग! जरुते पुरी हो जाती हैे. ख्वाईशे बादशहांची पूर्ण होत होत नाही. चाह !
चांगली की वाईट! परंतू आम्ही खूप हुशार आहोत, ज्यांचा जसा अर्थ काढयचा, तीकडून आम्ही असतो. आपण भिकारी म्हणून येता की… एखाद्या मंदिरात एक भिकारी अन् दुसरा म्हणजे भक्त! असेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.