जालना : गेल्या काही दिवसापासून आपण सर्वजन भगवान महावीरांची वाणी ऐकत आहोत. त्या वाणीत बरेच काही आहे, त्याचा पुरेपूर लाभ हा आपल्याला घ्यायचा आहे, तो घेण्यात कसलाही कसूर ठेऊ नये, असा हितोपदेश साध्वी प. प. सत्यसाधनाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या.
तत्पूर्वी साध्वी प. प. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी पुढे बोलतांना साध्वी प. प. सत्यसाधनाजी म. सा. म्हणाल्या की, गेले काही दिवसापासून प्रभू भगवान महावीरांची वाणी आपण ऐकत आलो आहोत, सध्याही त्यावरच चिंतन सुरु आहे. आज आपण उत्तरायण सुत्रातील दहाव्या आणि बाराव्या अध्यायाचा अभ्यास केला आहे. उर्वरित पुढे चालून अभ्यास करु परंतू भगवान महावीरांची ही वाणी व्यर्थ जाणारी नाही. त्याने आपणासर्वांचे कल्याणच होणार आहे, हानी मुळीच होणार नाही. परंतू तशी श्रध्दा आणि भक्ती आपण केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी प. पू. साध्वी हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनीही मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, आगमची ही वाणी प्रत्येकाने श्रवण केली पाहिजे. त्यातच आपणासर्वांचे हित आहे. भवसागरातून निघून जायचे असेल तर ही वाणी आपण सर्वांनी ऐकली पाहिजे. भवोको कम करणे के लिए ये करना जरुरी है। दसवा अध्यन बहोत महत्वपूर्ण है।
गौतम स्वामींना प्रभू महावीर समजावून सांगतात. एक बार नाही तर छत्तिसवेळेस भगवान महावीर सांगतात, जो ही वाणी ऐकेल, वाचेल तो तरुन जाईल, असे सांगून त्यांनी प्रभू महावीर आणि उत्तरायण सुत्राबद्दल विविध उदाहरणाव्दारे इंत्यभूत माहिती दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती.