“ स्कायलार्क” या सनदी लेखापाल कार्यालयाचे डॉ. शिवाजी झावरे सरांच्या शुभहस्ते शानदार उद् घाटन – मान्यवरांकडुन शुभेच्छांचा वर्षाव! आठ समवयस्क सनदी लेखापालांनी संयुक्तिक रित्या एकत्र येत कार्पोरेट जगताला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर प्रणाली , सेवाकर, रेरा आदि सेवा प्रदान करण्याच्या द्रुष्टीने “स्कायलार्क” नावाने एका भव्य कार्यालयाचे उद् घाटन सनदी लेखापालांना घडविणारे प्रसिद्ध संस्था चालक डॉ. शिवाजी झावरे सरांच्या शुभहस्ते नुककेच करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीए डॉ. अशोक पगारिया होते. CA महावीर कोठारी, सारिका चोरडीया, वैभव मोदी, विनोद संचेती, यश कुवाड, हर्षल लोढा, अजिंक्य जांगड़ा, नीतीश वैध्य आदि स्कायलार्क चे भागीदार आहेत. या प्रसंगी CA सारिका चा डॉ. झावरे सर व प्रा. अशोक पगारियांच्या उपस्थितीत आकुर्डी निगडी प्राधिकरण जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाषजी ललवाणी यांचे शुभहस्ते शाल, माल्यार्पण व भ. महावीरांची प्रतिमा देवुन गौरविण्यीत आले. या प्रसंगी आकुर्डी निगडी प्राधिकरण श्री संघाचे विश्वस्त, गुरु आनंद प्रार्थना मंडलाचे सदस्य, उद्योग व विविध क्षेत्रातील मान्यवर व सनदी लेखापालांचे कुटुंबीय उपस्थित होते .