श्रीरामपूर दि. 26 (वार्ताहर) : जीवनात सुख दुख असणाराच जो संकटाला धैर्याने तोंड देतो तोच जीवन आनंदाने सुखाने जगु शकतो असे विचार प. पू. विश्वदर्शनाजी म.सा. यांनी जैन स्थानकात चातुर्मासात प्रवचनातुन व्यक्त केले.
धर्माकरीता जो स्वत:च्या प्राणाची बाजी लावतो तोच खरा धर्मवीर असतो असे स्पष्ट करुन त्या म्हणाल्या की, धर्मपालन करण्यासाठी खंबीर मनोबल हवे. ज्ञानसंपन्न जीवाला बोधांची प्राप्ती होते. सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही. तो पर्यंत धर्माला अर्थ नसतो, धर्मात पुण्य प्राप्ती झाली की जीवाचा उध्दार होतो, चारित्र्य महत्वाचे आहे, आयुष्यात चढ उतार असतात, संघर्षाची अनुभूती घ्यायला हवी जे अपयशी ठरतात ते आयुष्यात बाद होतात. आयुष्य हे कांही तरी चांगले करण्यासाठी असते, घरापेक्षा बाहेर जास्त वेळ घालविण्यांत अनेकांना आनंद वाटतो.
वडील धार्यांच्या पुण्याईवर घर चालते, पुण्याचे एैश्वर्य वाढविले पाहिजे, लहान कामात ही पुण्य लाभते, पुण्यावान घरात वास्तव्य करणे, आनंददायक असते, दुसर्याबद्दल त्यांचे चांगले गुण आत्मसात करावे, तोंडात नेहमी साखर असतील तर दुसर्याकडुन सुध्दा चांगला प्रतिसाद मिळतो, सदगुणांचे एैश्वर्य वाढविले तर पुण्याची प्राप्ती होते.
नेहमी चांगल्या गोष्टीचे चिंतन करावे,दोषाकडे दुर्लक्ष करा, शब्दात मधुरपणा हवा, पैशावरुन घराची ओळख होत नाही. ज्या घरात सदैव हसत खेळत वातावरण असते, वडीलधार्यांचा आदर राखला जातो, तेच घर आदर्श असते असे पू. विश्वदर्शनाजी म.सा. यांनी नमुद केले.
विद्याभिलाषी प. पू. तिलकदर्शनाजी म.सा. यांनी ही प्रवचनातुन भक्ती व धर्म यामुळे जीवन सुखी होते असे सांगुन धर्म कसा करावा याचे महत्व विषद केले.