Sagevaani.com /जालना: सुई- दोर्याला आपण गाठ मारुन ठेवली तर धागा निघणार नाही. परंतू त्याच धाग्याला गाठ मारली नाही तर तो अलगतपणे निघेल, तसेच आपल्या आत्म्याचे आहे, तो आत्मा तरी परमात्मा कसा बनेल, असा हितोपदेश साध्वी प. प. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. यावेळी संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. यांचीही उपस्थिती होती.
पुढे बोलतांना साध्वी प. प. हर्षप्रज्ञाजी म. सा. म्हणाल्या की, आपल्याकडील पाचही इंद्रये ही सतत आपल्या ताब्यात राहवयास हवी, कानाला नेहमी चांगलेच ऐकावे वाटते, नाकाला नेहमी चांगलाच सुंगध आवडतो. तसेच डोळ्याचे पण आहे, त्यांनाही नेहमी चांगलेच पाहावे वाटते. तर तोंडाला नेहमी चांगलेच बोलण्याची सवय असते. उगीच एखाद्याने रागाने किंवा उर्मट बोलले तर ते आपल्याला ऐकावे वाटेल का? नाही ना! मग आत्म्याला तरी परमात्मा कसे बनावे वाटेल! याचा विचार आपण सतत केला पाहिजे. काल आपण सर्वांनी उत्तरायण सुत्राचा अर्थ जाणून घेतला आहे. आजही आपण त्या अनुषंगानेच मार्गदर्शन ऐकणार आहोत.
नेहमी आपली वाणी चांगली ठेवावी, या वाणीव्दारे प्रभूंचे नास्मरण करत जावे. आपल्या मोठ्या मुश्कीलपणे हा मनुष्य जन्म मिळाला आहे. त्याचे सार्थक करावे, असे सांगून त्यांनी प्रभू महावीर आणि उत्तरायण सुत्राबद्दल विविध उदाहरणाव्दारे इंत्यभूत माहिती दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती.