जालना: जीवन हे नेहमीच चांगल्या पध्दतीने जगले पाहिजे. खूप कठीण परिश्रमानंतर आपल्याला हा मानव जन्म मिळाला असून त्याचा सदुपयोग करुन घेतला पाहिजे, असा हितोपदेश साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा व अन्य काही साध्वींची याप्रसंगी उपस्थिती होती.
पुढे बोलतांना साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. म्हणाल्या की, मानव हा जन्म उगीच आपल्याला प्राप्त झालेला नाही. त्याचा सदुपयोग आपण केला पाहिजे, करायला शिकले पाहिजे. आत्मा तर बनलो आहोत परंतू परमात्मा कधी बनणार? याचा विचार आपण केला पाहिजे. संसार तर नेहमीच आहे. परंतू हे जीवन नेहमीच मिळणारे नाही. म्हणूनच त्याचा सदुपयोग करायला हवा. आपण आतापर्यंत अनेक साधू- साध्वींचे प्रवचन ऐकले असेल परंतू ते आपण आपल्या जीवनात उतरवले आहे का? आपण जोपर्यंत स्थानकात आहोत तो पर्यंत वैराग्यात राहतो. मात्र जसंही घरी जातो आणि संसारात रमून जातो. असे सांगून साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी आपल्या प्रवचनातून जीवनाबद्दल इंत्यभूत माहिती दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती.