Sagevaani.com /जालना: गुरुंच स्थान आपल्या जीवनात उच्चस्थानी असून ज्यांच्या जीवनात गुरु नाहीत, त्यांचे काहीही खरे नाही. आई ही प्रथम गुरु असली तरीही गुरु हे आपल्या जीवनात असायलाच हवेत, असा हितोपदेश साध्वी प.पू.गुरुछायाजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला. तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. व अन्य काही साध्वींची याप्रसंगी उपस्थिती होती. आजही संघामध्ये साध्वी प. पू. अर्हतज्योतीजी म. सा. यांनी विविध प्रकारचा जाप केला.
साध्वी प.पू.गुरुछायाजी म.सा. पुढे बोलतांना म्हणाल्या की, आजही संघात दिवाकर संत चोथमलजी म. सा. यांच्यावर आधारीत प्रवचन दिले. त्या म्हणाल्या की, संसारात गुरुंचं महत्व आहे. गुरुंमुळेच आपण तरुन जातो. गुरुंमुळे आपल्याला शक्ती प्राप्त होते. गुरु हे सर्वस्व आहेत. त्यांना विसरुन चालणार नाही, असे सांगून त्यांनी गुरु या शब्दाचे इंग्रजीत रुपांतर करुन त्याच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ स्पष्ट करुन सांगितला. गुरुंमुळेच आपल्या जीवनात चमत्कार घडतात.
आपल्या जीवनात प्रकाश पडतो तोच मुळात गुरुंमुळे! दिवाकर प. पू. चोथमलजी म. सा. यांचा सप्ताह सध्या संघात सुरु आहे. त्या अनुषंगानेच आजही साध्वी प.पू.गुरुछायाजी म.सा. यांनी प्रवचन सांगितले. त्या म्हणाल्या की, प्रगती करायची असेल तर गुरुंशिवाय पर्याय नाही, असे सांगून साध्वी प.पू.गुरुछायाजी म.सा. यांनी आपल्या प्रवचनातून विविध उदारणे दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती.