Sagevaani.com /जालना: समोरा- समोर घेतले जाते ते दर्शन! दर्शन या शब्दाचा अर्थ असा आहे की, देखना! आपण एखादी मुव्ही बघायला जातो, ती तीन तासाची मुव्ही पाहयला आपल्या आत्मदर्शन होते? तर नाही ना,
अशाच प्रकारे आपण दर्शन तर घेतो पण आत्मदर्शन कुठे आहे, हा प्रश्न शेवटी उरतोच, असा हितोपदेश साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा व अन्य काही साध्वींची याप्रसंगी उपस्थिती होती.
पुढे बोलतांना साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. म्हणाल्या की, तुम्ही या गणेश दरबारात येतात, कशासाठी येतात. तर गुरु गणेशलालजी म. सा. यांचं दर्शन घेण्यासाठी! आपण सुट्ट्यांच्या दिवसात लोणावला, महाबळेश्वर, हॉटेलात जातो तेथे गेल्यानंतर काय करतो तर जी वस्तू आपल्याला आवडते- भावते ती खरेदी करतो. तीन तासाची मुव्ही पाहिली तर आत्मदर्शन होते? नाही ना! प्रभू महावीरांनी काय सांगितले त्याचा अवलंब आपण आपल्या जीवनात करणार की नाही? असे सांगून त्या म्हणाल्या की, आपण दर्शन तर घेतो. परंतू आत्मदर्शनाच काय?
आपल्या मोठ्या मुश्कीलीने हा मानव जन्म मिळालेला आहे, त्याचा सदुपयोग करायलाच हवा. परंतू दुर्देवाने आपण तसे करतांना दिसत नाही, अशाने आपल्याला कसे घडेल आत्मदर्शन! असे सांगून साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी आपल्या प्रवचनातून आत्मदर्शनाबद्दल इंत्यभूत माहिती दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती.