जालना : मी अगर प्रभाकरवंजी महाराज साहेब यांना गणेशलालजी महारांजींची मानस कन्या म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. असे सांगून प. पु. रमणीकमुनींजी म्हणाले की, धर्माची सुध्दा एक आचार, विचार असते.
आाम्ही तर आहोत तसे प्रभू महावीरांचे संतान आहोत. मग ते श्रावक, असो नाही तर श्राविका असो. परंतू आज पुण्यतिथी मानत आहोत. भगवान महावीर हे आमच्या जीवनात सुध्दा असायला हवेत, असे वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना सांगितले.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साधू- साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, दोन अडीच वर्षे झाले महावीर आजही जिवंत आहे. ते का जिवंत आहे. महाराणा प्रताप आजही जिवंत आहेत. आजही जिवंत आहेत, सुभाषचंद्र बोस! आजही भारत स्वतंत्र भारताचे पंतप्रधान पंडीत नेहरु! त्यांना कसे आपण विसरणार!! कारण त्यांच्यामुळेच तर आजचे पंतप्रधानही आहे. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.