sagevaani.con /जालना: बारा वृत्तांपैकी एक संयम आहे. सामायिक वृत्त प्रत्येकाने घेतलेच पाहिजे, असा काही नेम नेसला तरी आणि पचखान घेतले नसले तरी संयम हा प्रत्येकाने नियमाप्रमाणे घेतला पाहिजे, असा हितोपदेश साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा व अन्य काही साध्वींची याप्रसंगी उपस्थिती होती.
ये तो सच की है भगवान है! या गितावर आधारीत पुढे बोलतांना साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. म्हणाल्या की, महाराज साहेबांचा बंगलोर येथे चातुर्मास चालू होता. आपण तर त्यावेळी लहान होतो, परंतू पाच भावांच्या दहा सोन्याच्या दुकाना होत्या. मग ती दुकान बारा वाजता किंवा एक वाजता बंद होवो परंतू ते पाचही जण ज्यावेळी त्यांनी ज्यावेळी संयम घेतला त्याचवेळी ते झोपी जायचे! असा त्यांचा नियम होता.
असा नियम प्रत्येकानेच पाळायला हवा. त्याशिवाय आपली आत्मा मोक्षाला जाणार नाही. आपल्या नरकात जायचे नसेल तर झोपण्यापूर्वी संयम हा घेतलाच पाहिजे. मग दिवसभर आपण दुकान सांभाळा नाही तर आणखी काही परंतू झोपण्यापूर्वी संयम हा घेतलाच पाहिजे, त्याशिवाय आपला आत्मा मोक्षाला जात नाही, असे सांगून त्या म्हणाल्या की, आपली श्रीपाळची कहाणी चालू आहे. काल आपण कुठपयर्ंत आलो होतो. श्रीपाळ हा समुद्र तटावर पोचले होते. तेथे पोहचल्यानंतर त्यांनी मानलेला बाप धवलसेठ हा मृत्त्यूच्या थारोळ्यात पडलेला असतो.
जो दुसर्यासाठी खड्डा खदतो तो स्वत:च खड्ड्यात जातो. अशीच गत धवलसेठची झाली परंतू श्रीपाळने त्यांची संपूर्ण विधी केली. ते असे म्हणाले की, धवलसेठ मला खूप त्रास दिला आहे. अशा वडीलांचा विधी मी कसा करु! अगोदरच श्रीपाळ यांचे पाच लग्ने झाली आहेत. त्यांनी परत सहा मुलींशी विवाह केला, म्हणजे एकुण अकरा जणींसोबत त्यांनी विवाह केला. शेवटी परत ते विवाह बंधनात अडकतात. अशाप्रकारे त्यांचे एकुण बारा लग्ने होतात, असे सांगून त्यांनी श्रीपाळबद्दल इंत्यभूत माहिती दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती.