Sagevaani.com /जालना: नवकार हा मंत्र नुसता मंत्रच नाही तर तो खर्याअर्थाने महामंत्र आहे. एमडब्लू गाडीमध्ये आज कोणाला बसू वाटत नाही, परंतू ज्यातच मनवफकार आहे तो महामंत्र ज्यांच्याकडे आहे त्याला अशा कारची गरजच नाही, असा हितोपदेश साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा व अन्य काही साध्वींची याप्रसंगी उपस्थिती होती.
नवकार या गितावर आधारीत पुढे बोलतांना साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. म्हणाल्या की, आपल्याकडे श्रध्दा असायला हवी. मग कोणीही काहीही करु देत आपल्याला काहीही होत नाही आणि होणार नाही, मात्र ज्याकडे श्रध्दा नाही, अशांचा आत्मा परमात्मा कसा काय बनेल? एक कार आपल्याला आपल्या हव्या ठिकाणी पोहचू शकते, अगदी अशाच प्रकारे ज्याकडे नवकार मंत्राची आराधना आहे, तो आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोहचू शकतो, त्याला रोखणे ही कोणाच्यातही शक्ती नाही, ताकद नाही. ही ताकद आणि शक्ती आपल्याला केवळ केवळ नवकार मंत्रातूनच मिळू शकते. नवकार मंत्र हा केवळ मंंत्र नाही, तर तो गुणकारी असून गुणवान सुध्दा आहे. म्हणूनच अनेक जण या मंत्राचा उच्चार करतांना आपल्याला दिसतात.
शिवाय या मंत्रात कोणत्याही व्यक्तीचे नाव नाही की अन्य काही आहे, असे सांगून त्यांनी नैना सुंदरी आणि श्रीपाळ यांची कहाणीही यावेळी सांगण्यास सुरुवात केली. श्रीपाळ यांच्या जन्मापासून ते बालपणापर्यंतचा इतिहास त्यांनी सांगितला. साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी आपल्या प्रवचनातून नवकार महामंत्र आणि श्रीपाळ व नैनासुंदरीबद्दल इंत्यभूत माहिती दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती. शेवटी संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देखील केले.