Sagevaani.com /जालना: जीवनात आल्यानंतर तप हे केलेच पाहिजे. तप करणार्यांची अनुमोदना केली पाहिजे, त्यांना प्रोहत्सान दिले पाहिजे, त्याचे पुण्यकर्म हे आपल्यालाच लाभते, असा हितोपदेश साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा व अन्य काही साध्वींची याप्रसंगी उपस्थिती होती.
नवकार मंत्राची महिमा अपरामपार या गितावर आधारीत पुढे बोलतांना साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. म्हणाल्या की, नवपद ओलीचा आजचा शेवटचा दिवस! प. पू. गुरु गणेशलालजी महाराजांनी जालन्यात ज्यावेळी प्लेगची साथ आली होती. त्यावेळी काय केले होते. हे आपणासर्वांना अवगत आहे.म्हणून जे कोणी तप करत असतील त्यांची अनुमोदना केली पाहिजे, त्यांना प्रोहत्सान दिले पाहिजे. नवपद ओलीमध्ये तपाला अनन्य साधारण महत्व आहे.
तप करणे हे सोपे नसले तरी त्यामुळे शरीराला ताडण देणे म्हणजे आपल्या आत्म्याला ताडण दिल्यासारखे आहे. तप करना और तप करनेवालो को अनुमोदना देना, उनका स्वागत करना, उन्ही को प्रोहत्सान देना, यह बात हमे अच्छी तरहसे ध्यान रखना चाहिए! ना की जो तप नही करते उनकी अनुमोदना नही करना! तप करते करते हमारी आत्मा को हम भुखा रख रहे तो कुछ भी नही होता, असे सांगून त्या श्रीपाद नरेश कडे वळल्या. त्यांनी श्रीपाळबद्दल इंत्यभूत माहिती दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती.