Sagevaani.com /जालना: दिवाकर सप्ताहाचा आजचा सातवा दिवस! दिवाकर प.पूू.चोथमलजी म. सा. यांचा जन्म दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुंची दृष्टी आपल्यावर सातत्याने पडावी, असे वाटत असेल तर त्यासाठी गुरु हवे तर चोथमलजी म. सा. यांच्या सारखा! भगवान महावीरांची नुसती दृष्टी गौतमजींवर पडली होती, त्यातून त्यांचे कल्याण झाले, असा हितोपदेश साध्वी प.पू. अर्हतज्योतीजी म. सा.यांनी येथे बोलतांना दिला.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. व अन्य काही साध्वींची याप्रसंगी उपस्थिती होती. आजही संघामध्ये विविध प्रकारचा जाप झाला.
साध्वी प.पू. अर्हतज्योतीजी म. सा. पुढे बोलतांना म्हणाल्या की, आपले शरीर हे चौर्यांशी लाख योजीतून बनलेले आहे. परंतू पैकी केवळ चौदा लाख योनींचीच पुण्यतिथी आणि जयंती, वाढदिवस साजरा करण्यात येतो. गुरु भगवंत चोथमलजी म. सा. त्यापैकी एक आहेत. म्हणून आपण त्यांचाही जन्म दिवस साजरा करतो. त्यांनी खूप पुण्य केले होते. म्हणून आपण त्यांचा जन्म दिन साजरा करीत आहोत. असे सांगून त्यांनी गुरुंचे महत्व आपल्या प्रवचनातून विषद करुन सांगितले. त्यानंतर संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा. यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, गेल्या सहा दिवसापासून आपण त्यांचा सप्ताह साजरा करीत आहोत. आज त्यांची जयंतीही साजरी होत आहे.
एकेकाळची गोष्ट आहे. मांगीलाल नावाचे एक साधू होऊन गेले. ते विचित्र वागत, विचित्र बोलत होते. त्यामुळे त्यांच्याजवळही कोणी फिरत नव्हते. परंतू प. पू. चोथमलजी म. सा. यांनी मात्र मांगीलाल मला द्या, अशी विनसणी त्यांनी आपल्या गुरुंकडे केली. शेवटी ती मान्यही झाली. परंतू प.पू. मांगीलांल म. सा. हे त्यांना त्रास देण्याची एकही संधी सोडत नव्हते. प्रवचन करता- करता प. पू. चोथमलजी म. सा. यांना उठावे लागत होते. कधी पाणी तर कधी काहीही मागण्याचा हट्ट प. पू. मांगीलालजी म. सा. साहेब त्यांच्याकडे धरायचे आणि तो हट्ट पुरवण्याचे काम प.पू. चोथमलजी म. सा. हे करायचे!
एक दिवस असा आला की, मांगीलालजींचे दिवस संपत आले, ते विचार करु लागले की, आपल्याला कोणीही जवळ घ्यायला तयार नव्हते, एकमेव चोथमल असा आहे की त्याने आपल्याला जवळच घेतले नाही तर सांभाळ सुध्दा केला. चोथमलजींना मांगीलालजींनी असा काही आशिर्वाद दिला की, हे चोथमल चारही दिशांना तुझी किर्र्ती पसरेल, तुझ्या मागे हजारो भक्त असतील! आणि खरोखरच तसेच घडले. सेवा करावी तर चोथमलजीं सारखी! नाही तर करुच नये, असे सांगून संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा.यांनी आपल्या प्रवचनातून विविध उदारणे दिली. याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले.