जालना : जीनवाणी हीच आपला आधार आहे. त्याशिवाय आपण सर्व जण निराधार आहोत. त्याशिवाय आपले काहीच खरे नाही. त्या मुळंच आपण कधीही जीनवाणीला विसरु नये, असे वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना सांगितले.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित श्रृत आराधनेच्या अध्यायातील प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, घरदार सोडून यायला कुणीही उगीच येत नाही. तर काहींना काही तरी चांगले भेटेल, शिकायला मिळेल, म्हणून ते येतात. आणि जीनवाणी तर आमच्यासाठी आवश्यक बाब आहे. ती नसेल तर आमचे कसे होईल, याचा साधा विचार केला जात नाही.
तीच आमच्या जगण्याचा आधार आहे, त्याशिवाय आम्ही निराधार आहोत, त्याशिवाय आम्ही जगूच शकत नाहीत, असेही ते यावेळी बोलतांना म्हणाले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात राम नाम के हिरे मोती, हे सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.