Sagevaani.com /जालना: भगवान महावीरांचा निर्वाण कल्याणक दिन जालना येथील श्री वर्धमान जैन श्रावक संघाच्यावतीने उत्साहात आणि त्यांना यावेळी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनादरम्यान जप करण्यात आला. हा जप यावेळी विचारपीठावर संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा; साध्वी अर्हतज्योतीजी म. सा; साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा; साध्वी हितसाधनाजी म. सा; प.पू.गुरुछायाजी म.सा; साध्वी सौम्यज्योतिजी म. सा. यांनी केला. तर साध्वी सत्यसाधनाजी म. सा. यांनी प्रभू भगवान महावीरांचे गुणगाण गाऊन मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सभा मंडपात अनेक श्रावक- श्राविकांसह संघाच्या पदाधिकार्याची मोठी उपस्थिती होती. शेवटी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन करुन सर्वांचे आभार मानले.