जालना : प्रवचन तर चांगले होते. परंतू आपली चप्पल जेव्हा चोरीला जाते. तेव्हा दोष हा त्या प्रवचनाला दिला जातो. प्रवचन करणार्याला दिला जातो. परंतू असाही विचार येऊ शकतो की, अशा हजार चप्पला मी प्रवचनासाठी कुर्बान करु शकातो. सांगण्याचं तात्पर्य हे की, आपण सर्वांनी श्रध्देला महत्व दिले पाहिजे, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा. बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, श्रध्दा म्हणायचं कशाला? आपण जो करता तो दिखावा आहे. म्हणून श्रध्देला महत्व दिले पाहिजे. समजा आपण प्रवचनाला गेलो परंतू आपली चप्पल चोरीला गेली. त्यावेळी मात्र आपण प्रवचनाला दोष देतो. परंतू आपण असाही विचार करु शकता की, प्रवचनासाठी मी अशा हजार चप्पला कुर्बान करु शकतो, ही आहे ती श्रध्दा! परंतू त्या प्रवचनाला नसतो गेलो तर माझी चप्पलच चोरीला गेली नसती. असा विचार केव्हा येतो? आपल्यात चांगला विचार करण्याची क्षमताच नाही. पहिले तो चोर को गाली! नंतर जो प्रवचनाला जाऊ पाहतो आहे, त्यालाही आपण जाऊ देत नाही. कधी- कधी तर मला वाटते प्रवचनाची जुतोसे जादा गिरी हुई है। आखीर कब तक जीनवाणी का एैसी अवहेलना कराल. मी सुधर्मा स्वामींचा दिवाणा आहे, सेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या धाराहिकला सुरुवात केली. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रयचनाची सांगता केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.