जालना : भोजन आणि भजन जितके पचेल तितकेच करावे. मग कुणी काहीही सांगू! ज्याने काही फायदा होत नाही, अशी कोणतीही गोष्ट करुच नये, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित श्रृत आराधना या विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. पुढे बोलतांना म्हणाले की, आपण जेव्हढे आनंदीत राहू तितके चांगले! ज्यापासून आपल्याला केवळ दु:खच मिळणार आहे, ती गोष्ट करायची कशाला? हमारे साधू तो बताते है की, सामायिक केल्याचे फळ मिळते. पण हमे तो ऐसा कोई नजर नही आता। हमारे घर हरदिन झगडे चलते है। तो हमने ऊस बंदे को कह दिया की, अगर ऐसा है तो अपुने सामायिक नही करना चाहीए। छोड दो! हमने तो बता दिया। अब मानना या ना मानना उसके उपर। भोजन और भजन आपुन को जितना भाता है, उतनाही करना चाहीए! जादा अगर करोगे तो वो पचता नही। और जो चिजसे अपना आनंद जाता है तो वो करना नही चाहीए। साधना मार्गावर कष्ट तर येतातच। ते सहन करण्याची शक्ती आपल्यात हवी आहे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.