जालना: भाऊ कसा असला पाहिजे हे लक्ष्मणाकडून शिकावे आणि अहंकार कसा असला पाहिजे हे रावणाकडून शिकले पाहिजे, असे वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना सांगितले.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित श्रृत आराधनेच्या अध्यायातील प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. पुढे बोलतांना म्हणाले की, भाऊ कसा असवा हे लक्ष्मणाकडून जसे आपण शिकतो तसे आजचे भाऊ आहेत, जीवाला देणारे भाऊ आज कुठे मिळतात. आणि अहंकारी रावणासारखे आम्ही वागतो. त्यामुळेच आज जिथे- तिथे अहंकारी व्यक्ती आपल्याला आढळून येतात.
तुळशीदासांनी रामाययण लिहिलं परंतू त्यांनी जे नाव दिलं ते अत्भूत आहे. रामचरित्र मानस! त्यांना केवळ राम हे नाव देता आलं असतं, परंतू त्यांनी ते दिलं नाही. केशी कुमार हे अंतीम असले तरी ते अंतीम नाहीत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. केशी कुमार आणि गौतम स्वामींच्या संतांची भेट झाली. विना वस्त्र संतांनी राहिले पाहिजे.
लक्ष्य एकच मोक्षाला जाण्याचं! परंतू त्यांच्यात हा भेद आला कुठून! असेही ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.