जालना : भगवान महावीरांना खूप काही अपमान सहन करावा लागला. काठ्यांनी मारहाण त्यांना सहन करावी लागली, आपण तर त्यांच्यापुढे काहीच नाहीत, असे वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना सांगितले.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, कोणत्या ना कोणत्या कारणाने सद्गुरुंशी जोडून रहा, यही प्रबोध बनता है। विरत्थुई का आनंद अद्भूत है। दुनियाभर में हर हस्थीयोंओं से मिले होगे। पर इस हस्तीओंसे एकबार मिलो, फीर देखो। ये क्या ऐसी वैसी हस्ती नही है । आज फीर ग्यारावी गाथा का उच्चारण उन्होंनें कीया। ते म्हणाले की, मुख्य दोन ग्रह आहेत. एक चंद्र आणि दुसरा सुर्य ! सुंदर- सुंदर नंदन आहे. क्या माहोल है। क्या सुगंध है। ऊस नंदन में उच्च पदवीधारी है। मौज मस्ती करायला या ठिकाणी जाऊ शकतात. तुम्ही सुध्दा जाता! इसी चिज को जोडकर हम आगे जा रहे है।
नऊ गाथा से चौदावी गाथापर्यंत याचे म्हणजे सुमेधू पर्वताचे वर्णन आहे. हम नही देख पाहते. क्यों की, हमारे पास वो ऑखेही नही. कोणच्या मनात चालू आहे, हे कसे आपल्याला कळणार! असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.