Share This Post

Featured News / Featured Slider / Khabar

फोर्स मोटर्स लि च्या निव्रुत्त कर्मचारी व कामगारांचा स्नेह मिलन मेळावा- 150 जणांचा सहभाग

फोर्स मोटर्स लि च्या निव्रुत्त कर्मचारी व कामगारांचा स्नेह मिलन मेळावा- 150 जणांचा सहभाग

निगडीः आज फोर्स मोटर्स लिमिटेड या जगविख्यात कंपनीतील निव्रुत्त अधिकारी,कर्मचारी व कामगारांचा स्नेह मेळावा अतिशय उत्साहवर्धक वातावरणात पार पडला.यावेळी कलांकुर प्रस्तुत स्वरमयी सफर या समुहाचा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कलाकुंरचे संचालक श्री शिवाजी ताठे व सहकार्यांनी जुनी- नवी अनेक गाजलेली अनेक गाणी सादर केली. प्रसिध्द गायिका प्रिती पेटकर या एकमेव गायिकेने पुरुष गायकांना साथ दिली व सर्व रसिक श्रोत्यांची मने जिंकली. गायन सादर करणारे सर्व मान्यवर उच्च शिक्षित विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. स्नेह मीलनाचे हे पांचवे वर्ष आहे . व आज 150 हुन अधिक निव्रुत्त कर्मचाऱ्यांनी स्नेह मेळाव्यात सहभाग नोंदवला. ज्यांनी वयाची 75वी ओलांडली अशा कर्मचाऱ्यांचा सन्मान श्री पी. के जैन, एस एस जैन ( ललवाणी) व सुनील निरंतर यांचे शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन करण्यात आला.

तर गायक कलाकारांचा सन्मान श्री दिलीप रासने विश्राम बांगर यांचे शुभहस्ते करण्यात आला. स्नेहमेळाव्याचे आयोजन नियोजन करणाऱ्या श्री श्रीकांत देशपांडे, दिलीप साळुंके,उदय घारे, संजय पुरंदरे व सुधीर देसाई यांचा सन्मान श्री सुभाषजी ललवाणी परिवारा तर्फे करण्यात आला. या प्रसंगी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त करतांना श्री एस एस जैन यांनी सुंदर नियोजन व गत पाच वर्षापासून सातत्याने या मेळाव्याच्या आयोजनाबद्दल धन्यवाद देत सातत्य टिकविण्याचे आवाहन केले. सदरच्या आयोजनमुळे भेटीगाठी होवून एकदुसर्याची आत्मियतेने विचारपुस केली जाते याचा आवार्जुन उल्लेख केला. व पुढील वर्षी सह दांपत्य आयोजनाची सुचना केली.

गायक श्री शिवाजी ताठे व प्रिती पेटकर व सहकार्यांचा उल्लेख करतांना उच्च शिक्षित व उच्च पदावर कार्यरत असतांना देखील संगीत व गायना सोबत आपली नाळ जोडुन ठेवल्याबद्दल गौरोद्गार काढले. गप्पा सप्पा, नाच गाणी आदिंचा सर्व उपस्थितांनी मनमुराद आनंद घेतला. गायक श्री शिवाजी ताठे व प्रिती पेटकरांचा विशेष सन्मान श्री सुभाष जैन ललवाणी यांचे शुभहस्ते शाल माळा व श्रीफळ देवुन करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगितीने व स्वर्गस्तांना श्रध्दांजली वाहुन झाली.

Share This Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

Skip to toolbar