जालना : जो शिष्य सद्गुरुंना जुडला आहे, अशा शिष्यला देवत्व आल्याशिवाय राहत नसेल परंतू देवत्व प्राप्त करणे ही गोष्ट काही सोपी नाही. भक्तीत राहून आसक्तीला कसे जवळ करता येईल, हे दोन्ही रस्ते वेगळे आहेत, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, परमवीर म्हणजे महावीर! परिपूर्ण आहेत ते! केवळ पूर्ण नाही तर परिपूर्ण आहेत. परिवार म्हणजे चारही बाजूंनी वार येत असतात ना! तो परिवार! तसे हे परिपूर्ण नाही. जे खरोखरच परिपूर्ण आहेत. विचार करा, चार गतीने फिरणे म्हणजे हा आपला झाला परिगृह! आप जिसको देखते नही कल्पना, कैसे होगे! उसकी हम कल्पना करते है पर अब जिसको हम देखते ना!
उसकी कैसे कल्पना करे। असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.