“आकुर्डी- निगडी- प्राधिकरण केंद्राचे उद्घाटन श्री संघाचे अध्यक्ष सुभाषजी ललवाणी यांचे शुभहस्ते गुरुमॉं उपप्रवर्तिनी पु. चंद्रकलाश्रीजी, प्रवचन- विभु पु. स्नेहाश्री जी म.सा., मधुरकंठी पु. श्रुतप्रज्ञाश्रीजी म.सा. यांच्या पावन सानिध्यात झालें . वितरण व्यवस्था पहाणारे श्री संघाचे विध्यमान विश्वस्त जवाहरजी मुथा, नेनसुखजी मांडोत, राजेंन्द्र जी छाजेड, हिरालालजी लुणावत, नितीनजी छाजेड, विजयजी नहार माधुरी भंसाली या प्रसंगी उपस्थित होते.
ना नफा ना तोटा या चत्वप्रणाली वर गेल्या 38 वर्षापासुन हा उपक्रम पुना मर्चंट चेंबर च्या माध्यमातुन राबवला जातो. गेल्या चार वर्षापासुन हा उपक्रम आकुर्डी स्थानकात राबवला जातो. गतवर्षी 7.5 टन एवढ्या फराळाच्या वस्तु आकुर्डी केंद्रात वितरित केल्या गेल्या . या वर्षी 10 हजार किलोचे उद्दिष्ट आहे. गुरुमॉं च्या मांगलीक ने उपक्रमाची सुरुवात आज आकुर्डीत झाली.