जालना : क्रोध, मान, माया लोभ हे अठरा पाप म्हणजे कौरवांची सेना आहे. आपण बर्याचदा म्हणतो की, मला क्रोध येतच नाही. पण समोरचा तसा वागतो म्हणून… हे मोहनिया कर्माचा खेळ आहे. ही मोहनिया कर्माची ही औलाद आहे, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, आत्माचे स्वभावीक गुण कोणता असेल तर तो म्हणजे क्षमा! माफ करणे म्हणजे किसी का दिल भर गया तो मेरी तो सब भडास निकाल गयी! कोई सुनेवालाही नही मिला था! डॉक्टरकडे आपण का जातो? तर तो आपल्याला ठिक करेल म्हणून. तोच जर बिमार पडत असेल तर त्याच्याकडे कोण जाईल. जब साधू- साध्वी एकमेकांची क्षमा मागत नाही तोपर्यंत लगवीला जात नाही, हे आगममध्ये प्रभूंनी सांगितले आहे. श्रावक- श्राविकांसाठी नियम आहे की, महिने दोन बार मोक्का दिला आहे. सवंतरीमध्ये तरी माफ मागा!
दिगंबर संत तरुण सागर नेहमी सांगायचे की, कुणाशीही भांडा, लढा परंतू त्याच्याशी बोलणे सोडू नका. कारण बोलणे बंद म्हणजे कनेक्शन कट! सलता आयीगी। प्रभू महावीरांनाही अनेकांनी छळ् केला. दगड फेकून मारले. त्यांनी स्वत:ला चेक करुन पाहिले आहे की, मला क्रोध आला की, नाही। दुसरा थर्मा मिटर आला आहे, असे समजा! कयास मुक्त व्हायचे असेल तर मैत्री भावात या, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.