जालना : जैनांमध्ये म्हणजेच जीन शासनात विश्वधर्म बनण्याची शक्ती सामावेली आहे, परंतू अनुयायी चांगले मिळाले नाहीत, असा हितोपदेश प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात प.पू. रमणीकमुनीजी म.सा. बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना प.पू.रमणीकमुनीजी म. सा. यांनी महाराष्ट्रातीलच काका कालेकर यांचे नांव घेत वरील उद्बोधन केले. ते म्हणाले की, काका कालेकर हे विध्दान होते. त्यांनी जीन शासनाबद्दल केलेले वाक्य तुम्हाला आवडते की, नाही. हे माहित नाही परंतू ते म्हणाले होते की, जैन धर्मात विश्वधर्म बनण्याची शक्ती आहे. परंतू या धर्माला अनुयायी चांगले मिळाले नाही. खरे आहे त्यांचे! आम्ही वेगवेगळ्या संप्रदायात गुंरफटून गेलो आहोत.
कुणी दिगंबर तर कुणी स्थानकवासी तर कुणी तेरापंथी, असे सांगून ते म्हणाले की, जगाच्या पाठीवर असा कोणताही धर्म नाही की, जो माणूसकी शिकवत नाही. जैन, बौध्द, शिख आदी धर्म सुध्दा आपल्याला इन्सायत (माणूसकी) शिकवतात. परंतू आपण ही बाबच विसरुन गेलो आहोत. वाईटाला विसरने आणि चांगल्याच स्वीकार करणे. परंतू दुर्देवाने आपण जिथे- तीथे जेजच्या भूमिकेत वावतो, मी ही गलती करणार नव्हतो. परंतू ती समोरच्यामुळे झाली आहे. भगवान महावीरांच्या कानात खिळे ठोकतांना किती वेदना त्यांना झाल्या असतील. परंतू तेही खिळे ठोकणाराची काळजी करत होते, असे सांगून त्यांनी आजपासून एक धारावाहिक सुुरु केली.
यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देखील प.पू.श्रमण संघ,रमणीकमुनीजी म. सा. यांनी दिली. त्यांनी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली.
यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.