जालना : या शरीराचा काहीही भरोसा नाही. ते केंव्हाही जाऊ शकते. म्हणूनच थोडेफार राहिलेले दिवस सेवेत घाला, हे मन भटकंती करणारं आहे, त्याचाही काही भरोसा नाही. ते भटकंती करेल याचा! म्हणूनच सुधर्मा स्वामी जे जम्बूू स्वामींना सांगतात त्याकडे लक्ष द्या, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, पंजाबमध्ये एक म्हण आहे की, मनाला आवर घालयचा असेल तर जे ज्या ठिकाणी योग्य आहे, ते त्याठिकाणी नेऊन ठेवा म्हणजेच या मनाचीही शांती होईल आणि मन ही भटकंती करणार नाही. याच मनावर सारा खेळ अवलंबून आहे.
साधनेत जसे सातत्य हवे, तसेच ती देखावाही नसू नये. ये दिया हुवा शरीर हो! जेथून आध्यात्म येते, आणि तेथूनच आत्माही आणि सामाईक आणि येथूनच आपल्याला शरीर मिळते. ये नाम भी अपूनने दिया नही! नाम भी कसी का है! भाषा आणि जेवर, घडीयॉ, मकान भी किसी ओर का दिया है! मैं क्या- क्या बतावू, ये मेरा, ये तेरा! कब तक करते रहोगे !
आपुन जो मेरा- मेरा, कर रहे ना! वो तो मरने बादभी… मोहनीया करम आमचं जसं जसं वाढत जाईल, तसं तसं आपण खाली जाल आणि मित्र भाव जसा- जसा वाढत जाईल, तसं- तसं आपलं मोहनिया कर्म कमी होईल, असेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. याप्रसंगी संघाचे महामंत्री डॉ.धरमचंद गादिया यांनी सुत्रसंचालन केले. तर यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.